Judges 8:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग गिदोन, जेवह आणि सलमुन्ना यांना म्हणाला, “तुम्ही ताबोर डोंगरावर काही माणसे मारलीत. ती दिसायला कशी होती?” जेबह आणि सलमुन्ना म्हणाले, “ती तुझ्याप्रमाणेच चांगली राजबिंडी दिसत होती.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग त्याने जेबह व सलमुन्ना ह्यांना विचारले, “तुम्ही ताबोर येथे ज्या पुरुषांचा वध केला ते कसे होते?” त्यांनी उत्तर दिले, “ते तुझ्यासारखेच होते. ते सगळे राजकुमारांसारखे होते.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग गिदोनाने जेबह राजा व सलमुन्ना राजाला विचारले, “तुम्ही ताबोर येथे ज्या पुरुषांना ठार केले ते कसे होते?” त्यांनी उत्तर दिले, “ते तुझ्यासारखेच, प्रत्येकजण राजपुत्राप्रमाणे दिसत होते.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग जेबह व सलमुन्ना यांस तो म्हणाला, “जी माणसे तुम्ही ताबोर येथे मारली ती कशी होती?” तेव्हा ते बोलले, “जसा तू आहेस तशीच ती होती; त्यातला प्रत्येकजण राजाच्या पुत्रासारखा होता.”