Judges 8:22 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग इस्राएल लोक गिदोनला म्हणाले, “तू आम्हाला मिद्यानी लोकांच्या तावडीतून सोडवले आहेस तेव्हा आता तू आमच्यावर राज्य कर. तू तुझा मुलगा, तुझा नातू यांनीही आमच्यावर राज्य करावे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा इस्राएल लोक गिदोनाला म्हणाले, “तुम्ही व तुमच्या पुत्रपौत्रांनीही आमच्यावर अधिकार गाजवावा, कारण तुम्ही आम्हांला मिद्यानांच्या तावडीतून सोडवले आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता इस्राएलचे लोक गिदोनास म्हणू लागले, “तू आमच्यावर राज्य कर; तू आणि तुझे पुत्र आणि तुझे नातूही; कारण मिद्यानी लोकांच्या हातातून तू आम्हाला सोडविले आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा इस्राएलातल्या मनुष्यांनी गिदोनाला म्हटले, “तू, तुझ्या पुत्राने आणि तुझ्या नातवाने आमच्यावर राज्य करावे, कारण तू आम्हास मिद्यानाच्या तावडीतून सोडवले आहे.”