Judges 9:19 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यरुब्बाल आणि त्याचे कुटुंबीय यांच्याशी तुम्ही खरोखरच प्रमाणिक असाल तर अबीमलेखच्या राज्यात सुखी असा. तो ही तुमच्यावर आंनदाने राज्य करो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जर तुम्ही आज यरुब्बाल व त्याचे घराणे ह्यांच्याशी सात्त्विकतेने व सरळपणे वागला असाल तर अबीमलेखामुळे आनंद करा व तोही तुमच्यामुळे आनंद करो;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आज तुम्ही यरूब्बआल आणि त्याच्या कुटुंबासोबत सन्मानाने आणि सदिच्छेने वागलात काय? तर मग अबीमेलेख तुमचा आनंद होवो आणि तुम्ही त्याचा आनंद होवो!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तर तुम्ही आजच्या दिवशी यरूब्बालाविषयी व त्याच्या घराण्याविषयी खरेपणाने व प्रामाणिकपणाने जर वर्तणूक केली असेल, तर अबीमलेखामध्ये संतोष करा; त्यानेही तुमच्यामध्ये संतोष करावा.