Judges 9:28 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा एबेदपुत्र गाल म्हणाला, “आपण शखेमचे लोक आपण त्याच्या राजवटीत का राहावे? तो कोण समजतो स्वत:ला? यरुब्बालच्या मुलांपैकी तो एक, बरोबर? जबूलला अबीमलेखने अधिकारी केले आहे. खरे ना?आपण अबीमलेखला जुमानता कामा नये. आपण आपल्याच लोकांचे हमोरच्या लोकांचे ऐकले पाहिजे. (हमोर हा शखेमचा मूळ पुरुष)
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा एबेदाचा मुलगा गाल म्हणाला, “अबीमलेख कोण की आम्ही शखेमकरांनी त्याचे अंकित असावे? यरुब्बालाचा मुलगा व त्याचा कारभारी जबूल हे शखेमाचा बाप हमोर ह्याच्या कुळातील लोकांचे अंकित असतील! पण आम्ही अबीमलेखाचे अंकित का असावे?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर एबेदचा पुत्र गाल म्हणाला, “अबीमेलेख कोण आहे आणि आम्ही शेखेमी लोकांनी त्याची चाकरी का करावी? तो यरूब्बआलाचा पुत्र नाही का आणि त्याचा कारभारी जबुल नाही का? शेखेमचा पिता हमोरच्या कुटुंबाची तुम्ही सेवा करा! अबीमेलेखाच्या कुटुंबाची आम्ही सेवा का करावी?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा एबेदाचा पुत्र गाल बोलला, “अबीमलेख कोण आहे की आम्ही त्याचे दास असावे? यरूब्बालाचा मुलगा व त्याचा कारभारी जबुल हे शखेमाचा बाप हमोर यांच्या कुळांतील लोकांचे दास असतील पण आम्ही अबीमलेखाची सेवा का करावी?