Judges 9:29 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुम्ही मला या लोकांचा सेनापती नेमले तर मी अबीमलेखला नेस्तनाबूत करीन. “आपल्या सैन्याची जमवाजमव कर आणि युध्दाला सज्ज हो, असे मी त्याला आव्हान देईन.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे लोक माझ्या हुकमतीखाली आले तर किती बरे होईल! म्हणजे मी अबीमलेखाला पदच्युत करीन.” मग तो अबीमलेखाला उद्देशून म्हणाला, “आपल्या सैन्याची जमवाजमव कर आणि ये बाहेर!”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जर हे लोक माझ्या अधिकारात असते तर किती बरे झाले असते! तेव्हाच मी अबीमेलेखाला काढून टाकले असते. मी अबीमेलेखाला म्हणेन, ‘तुझे संपूर्ण सैन्य घेऊन बाहेर पड आणि लढाई कर!’ ”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि हे लोक माझ्या हाती असते तर किती बरे होते! म्हणजे मी अबीमलेखाला काढून टाकले असते. मी अबीमलेखाला म्हणेन, तू आपले सैन्य बाहेर बोलाव.”