Judges 9:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अबीमलेखच्या मामांनी शखेम नगरातील अधिकारी मंडळींना हा प्रश्न विचारला. त्यांनीही अबीमलेखला आपला पाठिंबा द्यायचे ठरवले. ते म्हणाले, “हा तर आमचा बंधू आहे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा त्याच्या आईच्या भाऊबंदांनी त्याच्या बाजूने बोलून त्याचे हे म्हणणे शखेमाच्या सर्व प्रमुख नागरिकांच्या कानावर घातले; अबीमलेख हा आपला बांधव आहे असा विचार करून त्यांचे मन त्याच्याकडे वळले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा बंधूंनी हे सर्व शेखेमातील नागरिकांना सांगितले, त्यांनी अबीमेलेखाचे अनुसरण करण्याचे ठरविले, कारण ते म्हणाले, “तो आमचा नातेवाईक आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा त्याच्या आईचे नातेवाईक त्याच्याविषयी शखेमांतल्या सर्व मनुष्यांशी बोलले, आणि त्यांनी अबीमलेखास अनुसरण्याचे मान्य केले, कारण त्यांनी म्हटले, “तो आमचा भाऊ आहे.”