Judges 9:31 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्याने अरुमा येथे दूत पाठवून अबीमलेखला हे वर्तमान पोचवले. तो संदेश असा: एबेदाचा मुलगा गाल आणि त्याचे भाऊबंद शखेम शहरात येऊन राहिले आहेत. ते तुला त्रास देण्यासाठी कारस्थान करत आहेत. त्यांनी सगव्व्या शहरवासियांना तुझ्याविरुद्ध फितवले आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने अरुमा येथे जासूद पाठवून अबीमलेखाला कळवले की, “एबेदाचा मुलगा गाल व त्याचे भाऊबंद शखेमाला येऊन येथील नागरिकांना तुमच्याविरुद्ध चिथावत आहेत;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याने अबीमेलेखकडे दूत पाठवून त्याला कळविले, “एबेदचा पुत्र गाल व त्याचे भाऊबंद शेखेमात आले आहेत आणि आता ते या शहराला तुझ्याविरुद्ध चिथावीत आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग त्याने कपट करून अबीमलेखाजवळ दूत पाठवून असे सांगितले की, “पाहा, एबेदाचा पुत्र गाल आपल्या भावांसोबत शखेमास आला आहे; आणि पाहा, ते तुझ्याविरूद्ध नगराला चिथावत आहेत.