Judges 9:38 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा जबूल गालला म्हणाला, “मग आता तुझे बढाया मारणे कुठे गेले? “अबीमलेख कोण? आम्ही त्याचे का ऐकावे’ असे तू म्हणत होतास नाही का? त्यांना तू हसण्यावारी नेलेस. आता आणि त्यांचा सामना कर.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा जबूल त्याला म्हणाला, “ज्या तोंडाने अबीमलेख कोण आहे, आणि आम्ही त्याचे अंकित का व्हावे, अशी तू बढाई मारत होतास त्याचे आता काय झाले? ज्यांना तू तुच्छ लेखलेस तेच ना हे लोक? तर आता हो पुढे आणि लढ त्यांच्याशी!”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा जबुल त्याला म्हणाला, “आता तुझे ते मोठेपणाचे बोलणे कुठे आहे, तू जे बोलला होता, ‘अबीमेलेख कोण आहे की त्याची चाकरी करावी?’ हीच माणसे आहेत ना ज्यांची तू थट्टा केली होती? तर बाहेर जा आणि त्यांच्याशी लढ!”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग जबुल त्यास बोलला, “तू आपल्या ज्या तोंडाने बोललास, अबीमलेख कोण की, आम्ही त्याची चाकरी करावी ते आता कोठे आहे? ज्या लोकांस तू तुच्छ केले, ते हेच की नाहीत? आता मी म्हणतो, तू बाहेर जाऊन त्यांच्याशी लढाई कर.”