Judges 9:49 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा त्यांनीही फांद्या तोडून घेतल्या व अबीमलेखच्या पाठोपाठ ते चालू लागले. एल-बरीथच्या तळघरासमोर त्या रचून ठेवल्या मग त्यांनी त्या ढिगाला आग लावली. त्या आगीत आतील सर्व माणसे जळून खाक झाली. शखेमच्या मनोऱ्याजवळ राहाणारी बायकापुरुष मिळून जवळ जवळ हजार माणसे त्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा सर्व लोक एकेक फांदी तोडून घेऊन अबीमलेखाच्या मागे गेले आणि त्यांनी त्या फांद्या तळघराच्या तोंडाशी रचून पेटवून दिल्या. त्यामुळे शखेमाच्या गढीतले सुमारे हजार स्त्रीपुरुष मेले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणून सर्व माणसांनी फांद्या तोडल्या आणि अबीमेलेखाच्या मागे चालले. त्यांनी फांद्यांची रास बुरुजाच्या चहूबाजूंनी लावली आणि लोक आत असता त्याला आग लावली. अशा रीतीने शेखेमाच्या बुरुजामध्ये असलेले सुमारे एक हजार स्त्रीपुरुष मरण पावले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा सर्व लोकांतल्या एकएकाने फांदी तोडून घेतली, आणि ते अबीमलेखाच्या मागे चालले; मग त्यांनी, त्या फांद्या बुरुजाला लावल्या व ते लोक आत असता बुरूजाला आग लावली; अशा प्रकारे शखेमाच्या बुरुजातले सर्व पुरुष व स्त्रिया मिळून सुमारे एक हजार इतके लोक मरण पावले.