Judges 9:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अबीमलेख अफ्रा येथे आपल्या वडीलांच्या गावी आला व त्याने आपल्या सत्तर भावांची एकाचवेळी कत्तल केली. फक्त त्यातला सगव्व्यात धाकटा लपून बसल्यामुळे बचावला. त्याचे नाव योथाम होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग त्याने अफ्रा येथे आपल्या बापाच्या घरी जाऊन आपले भाऊ म्हणजे यरुब्बालाचे सत्तर मुलगे ह्यांची एकाच खडकावर कत्तल केली; तरी यरुब्बालाचा सर्वांत धाकटा योथाम हा वाचला, कारण तो लपून राहिला होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो ओफराह येथील आपल्या पित्याच्या घरी गेला व तिथे एका दगडावर त्याने आपल्या सत्तर भावांचा म्हणजे यरूब्बआलाच्या पुत्रांचा वध केला. परंतु यरूब्बआलाचा धाकटा पुत्र योथाम लपून निसटून गेला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो आपल्या वडिलाच्या घरी अफ्रासास गेला, आणि त्याने आपले भाऊ म्हणजे यरूब्बालाचे सत्तर मुले एका दगडावर मारले; तरी यरूब्बालाचा धाकटा पुत्र योथाम राहिला, कारण तो लपलेला होता.