Lamentations 1:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यरुशलेममधील सर्व लोक उसासे टाकत आहेत. ते अन्न शोधत आहेत. तो अन्नाच्या बदल्यात त्यांच्याजवळच्या चांगल्या वस्तू देऊन टाकत आहेत. जगण्यासाठी ते असे करीत आहेत. यरुशलेम म्हणते, “परमेश्वरा, माझ्याकडे जरा पाहा! लोक माझा तिरस्कार कसा करतात ते बघ तरी!
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तिचे सर्व लोक उसासे टाकत आहेत, अन्नान्न करीत आहेत, आपला प्राण वाचवण्यास त्यांनी भाकरीच्या मोबदल्यात आपल्या रम्य वस्तू दिल्या आहेत. “हे परमेश्वरा, लक्ष लावून पाहा, मी कशी तुच्छ झाले आहे!”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अन्नाचा शोध घेत असताना तिचे लोक कण्हत आहेत; मौल्यवान वस्तूच्या मोबदल्यात ते अन्न विकत घेत आहेत जेणेकरून ते जिवंत राहतील. “हे याहवेह, पाहा आणि याकडे लक्ष द्या, मी कशी घृणास्पद झाले आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यरूशलेमेमधील सर्व लोक कण्हत आहेत, ते अन्न शोधत आहेत. त्यांनी आपला जीव वाचावा म्हणून अन्नासाठी त्यांच्या जवळच्या मनोरम वस्तू दिल्या आहेत. “परमेश्वरा, माझ्याकडे पाहा! मी कशी कवडीमोलाची झाली आहे.”