Lamentations 1:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“माझी पापे परमेश्वराने आपल्या स्वत:च्या हाताने जोखडाप्रमाणे जखडली आहेत. परमेश्वराचे जोखड माझ्या मानेवर आहे. परमेश्वराने मला दुर्बळ केले. ज्यांच्या समोर मी उभी राहू शकणार नाही, अशांच्या हाती परमश्वराने मला दिले आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझ्या अपराधांचे जू त्याने आपल्या हातांनी जखडले आहे; माझे अपराध एकत्र गुंफले आहेत; ते माझ्या मानेला लागले आहेत; त्याने माझे बळ खचवले आहे; ज्यांच्यापुढे मला उठता येत नाही अशांच्या हाती प्रभूने मला दिले आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझी पापे गुलामगिरीचे जोखड बनली आहेत; त्यांच्या हातांनी ती एकत्र विणली गेली आहेत. ती माझ्या गळ्यात अडकविण्यात आली आहेत, आणि प्रभूने माझी शक्ती खचविली आहे. मी ज्यांचा सामना करू शकत नाही, त्यांच्या हाती मला दिले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझ्या पुष्कळ अपराधांचे जू त्याने आपल्या हाताने जखडले आहे. ते एकत्र गुंफले आहेत, आणि ते माझ्या मानेवर आले आहेत; त्यांनी माझी शक्ती निकामी केली आहे. ज्यांच्या समोर मी उभी राहू शकणार नाही, अशांच्या हाती परमेश्वराने मला दिले आहे.