Lamentations 1:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आता यरुशलेम म्हणते, “मी परमेश्वराचे ऐकण्याचे नाकारले. म्हणून परमेश्वर जे करीत आहे. ते योग्यच होय. तेव्हा सर्व लोकांनो, ऐका! माझ्या यातना पाहा! माझे तरुण तरुणी कैदी झाले आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“परमेश्वर न्यायपरायण आहे, मी तर त्याच्या आज्ञेविरुद्ध बंड केले आहे; अहो सर्व लोकहो, आता ऐका, माझे दुःख पाहा; माझ्या कुमारी व माझे तरुण बंदिवान होऊन गेले आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“याहवेह नीतिमान आहेत, तरीसुद्धा मी त्यांच्या आज्ञेविरुद्ध बंड केले. सर्व लोकांनो, इकडे लक्ष द्या; माझ्या वेदना पाहा. कारण माझे तरुण व तरुणी बंदिवासात गेले आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“परमेश्वर न्यायीच आहे, कारण मी त्याच्या आज्ञेविरूद्ध बंड केले आहे. सर्व लोकांनो, ऐका! आणि माझे दु:ख पाहा! माझ्या कुमारी व माझे तरुण पाडावपणांत गेले आहेत.