Lamentations 1:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
रात्री ती खूप दु:काने रडतेतिच्या गालांवर अश्रु ओघळतात. पण तिचे सांत्वन करणारे नाही. खूप राष्ट्रांशी तिची मैत्री होती. पण आता तिचे दु:ख हलके करणारे कोणीही नाही. तिच्या सर्व मित्रांनी तिच्याकडे पाठ फिरविली. तिचे मित्रच तिचे शत्रू झाले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ती रात्रभर रुदन करीत राहते, तिच्या गालांवर अश्रू आलेले आहेत; तिच्या सर्व वल्लभांपैकी तिचे सांत्वन करणारा कोणी नाही; तिच्या सर्व मित्रांनी तिला दगा दिला आहे; ते तिचे शत्रू बनले आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
रात्रभर ती अत्यंत रडत असते; तिच्या गालांवरून अश्रू ओघळत आहेत. तिच्या सर्व प्रियकरात तिचे सांत्वन करणारा कोणी नाही; तिच्या सर्व मित्रांनी तिचा विश्वासघात केला आहे; ते तिचे शत्रू बनले आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ती रात्री फार रडते व तिचे अश्रू तिच्या गालांवर असतात. तिच्या सर्व प्रियकरांमध्ये तिला दिलासा देणारा कोणी नव्हता. तिच्या सर्व मित्रांनी तिच्याशी विश्वासघात केला. ते तिचे शत्रू झाले आहेत.