Lamentations 1:21 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“माझे ऐका मी उसासे टाकीत आहे. माझे सांत्वन करणारा कोणीही नाही. माझा त्रासाबद्दल माझ्या शत्रूंना कळले आहे. त्यांना आनंद झाला आहे. तू माझे असे केल्यामुळे ते आनंदित झाले आहेत. तू म्हणालास की शिक्षेची वेळ येईल. व तू माझ्या शत्रूंना शिक्षा करशील. आता म्हटल्याप्रमाणे कर. माझ्याप्रमाणेच त्यांची स्थिती होऊ दे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांनी ऐकले की मी उसासा टाकत आहे व मला सांत्वन देणारा कोणी नाही; माझ्या सर्व वैर्यांनी माझ्या विपत्तीविषयी ऐकले आहे; तू हे केले म्हणून त्यांना आनंद झाला आहे. तू नेमलेला दिवस आणला म्हणजे ते माझ्यासारखे होतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“लोकांनी माझे कण्हणे ऐकले आहे, पण माझे सांत्वन करण्यास कोणीही नाही. माझ्या सर्व शत्रूंनी माझ्या संकटांबद्दल ऐकले आहे तुम्ही जे केले ते पाहून त्यांना आनंद झाला आहे; तुम्ही घोषणा केलेला दिवस येवो म्हणजे ते देखील माझ्यासारखेच होतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी कण्हत आहे हे त्यांनी ऐकले आहे. माझे सांत्वन करायला कोणी नाही. माझ्या सर्व शत्रूंनी माझे अनिष्ट ऐकले आहे. तू असे केल्यामुळे त्यांना आनंद झाला आहे. जो दिवस तू नेमला आहे तो तू आणशील तेव्हा ते माझ्यासारखे होतील.