Lamentations 1:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यहूदाने फार सोसले. नंतर यहूदाला कैद करून परमुलुखांत नेले गेले. यहूदा इतर राष्ट्रंमध्ये जगते, पण तिला आराम मिळाला नाही. तिचा पाठलाग करणाऱ्यांनी तिला पकडले. अरूंद दरीत त्यांनी तिला गाठले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यहूदाची कन्या जुलमामुळे व बिकट दास्यामुळे बंदिवान होऊन गेली आहे; ती राष्ट्रांमध्ये राहत आहे, तिला चैन नाही; तिचा पाठलाग करणार्या सर्वांनी तिला संकटावस्थेत गाठले आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पीडा व कठोर परिश्रम केल्यानंतर यहूदाह बंदिवासात गेली आहे. ती अन्य राष्ट्रांमध्ये राहते; आता तिला कुठेही आराम मिळत नाही. जे तिचा पाठलाग करीत असत, त्यांनी तिच्या पीडित परिस्थितीत तिला मागे टाकून दिले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दारिद्र्य आणि जुलमामुळे यहूदा दास्यपनात बंदिवान झाली आहे. ती राष्ट्रंमध्ये राहत आहे, पण तिला आराम मिळत नाही. तिचा पाठलाग करणाऱ्या सर्वांनी तिला तिच्या अत्यंत निराशेच्या मनस्थितीत तिला संकटावस्थेत गाठले आहे.