Lamentations 1:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यरुशलेमने फार पाप केले. तिच्या पापांमुळेच ती भग्नावशेष उरली. लोकांनी पाहून चुकचुकावे असेच ते रूप होय. पूर्वी लोकांनी तिचा आदर केला. पण आता तेच तिचा तिरस्कार करतात. त्यानी तिची निर्भर्त्सना केली म्हमून ते आता तिची घृणा करतात. यरुशलेम आता कण्हत आहे. ती तोंड फिरविते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यरुशलेमेने घोर पातक केले आहे; म्हणून ती किळसवाणी झाली आहे; जे तिचा आदर करीत ते सर्व तिला तुच्छ मानत आहेत, कारण त्यांनी तिची नग्नता पाहिली आहे; ती उसासे टाकते, तिने पाठ फिरवली आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण यरुशलेमेने भयंकर पापे केली म्हणूनच ती किळसवाणी झाली आहे. तिचा मान सन्मान करणारे आता तिला तुच्छ मानतात, कारण तिला विवस्त्र असे त्यांनी पाहिले आहे; ती कण्हते व वळून निघून जाते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यरूशलेमेने फार पाप केले आहेत; म्हणून ती अशुद्ध झाली आहे. सर्व जे तिचा आदर करत असत, त्यांनी तिला आता तुच्छ मानले आहे. कारण त्यांनी तिची नग्नता पाहिली आहे; ती कण्हत आहे व ती तोंड फिरविते आहे.