Lamentations 2:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तुझ्या संदेष्ट्यांनी तुझ्यासाठी दृष्टान्त पाहिले. पण त्यांचे दृष्टान्त म्हणजे निरर्थक व मुर्खपणाचे होते. तुझ्या पापाबद्दल त्यांनी उपदेश केला नाही. त्यांनी स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला नाही. पण त्यांनी खोटे संदेश देऊन तुला मूर्ख बनविले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुझ्या संदेष्ट्यांनी तुझ्यासंबंधाने निरर्थक व मूर्खपणाच्या गोष्टींचा दृष्टान्त पाहिला; तुझा बंदिवास उलटण्यासाठी तुझे दुष्कर्म प्रकट करायचे ते त्यांनी केले नाही; तर त्यांनी तुझ्यासंबंधाने निरर्थक व तुला हद्दपार करण्याजोगे दृष्टान्त पाहिले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुझ्या संदेष्ट्यांनी सांगितलेले दृष्टान्त खोटे व व्यर्थ होते; तुला बंदिवासात पडण्यापासून वाचविण्याकरिता तुझी पापे उघडकीस आणली नाहीत. त्यांनी तुला दिलेले संदेश खोटे व दिशाभूल करणारे होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुझ्या संदेष्ट्यांनी पाहिलेले दृष्टांत तुझ्यासाठी कपटी व मुर्खपणाचे होते. त्यांनी तुझे अपराध तुझे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी प्रकट केले नाही, तर तूझ्यासाठी फसवे दैवी संकेत आणि पाशाचे दृष्टांत निर्माण केले.