Lamentations 2:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ऊठ! रात्री आक्रोश कर. रात्रीच्या प्रत्येक प्रहराच्या आरंभाला रड. आपण पाणी ओततो. तसे मन मोकळे कर. परमेश्वरापुढे मन मोकळे कर. परमेश्वरापुढे हात जोड. तुज्या मुलांच्या प्राणरक्षणासाठी परमेश्वराजवळ प्रार्थना कर. कारण तुझी मुले उपासमारीने मूर्छित पडत आहेत. नगराच्या रस्त्या-रस्त्यावर ती बेशुध्द होऊन पडत आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ऊठ, रात्रीच्या प्रहरारंभी विलाप कर; प्रभूसमोर आपले मनोगत पाण्यासारखे ओत; तुझी बालके हरएक गल्लीच्या चवाठ्यावर भुकेने व्याकूळ झाली आहेत, त्यांच्या प्राणरक्षणासाठी त्याच्याकडे हात पसर.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
उठा, रात्री धावा करा, जसा रात्रीचा प्रहर सुरू होतो; त्यांच्यापुढे आपले हात उंचावून, प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्यावर भुकेने व्याकूळ होऊन बेशुद्ध पडणार्या तुमच्या मुलांच्या जीवनासाठी विनवण्या करा. प्रभूच्या समक्षतेत आपली अंतःकरणे पाण्यासारखी ओता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
रात्रीच उठून मोठ्याने आक्रोश कर. परमेश्वराच्या मुखापुढे आपले मन पाण्यासारखे ओता. जी तुझी मुले उपासमारीने नगराच्या रस्त्या-रस्त्यावर बेशूध्द होत आहेत, त्यांच्या जीवा करता तू आपले हात वर कर.