Lamentations 2:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वरा, माझ्याकडे बघ! तू अशा रीतीने जिला वागविलेस ती कोण आहे ते तरी पाहा! मला तुला एक प्रश्न विचारू दे: स्त्रियांनी पोटच्या मुलांना, खावे काय? ज्या मुलांची त्यांनी काळजी काळजी घेतली त्यांना स्त्रियांनी खावे काय? परमेश्वराच्या मंदिरात धर्मगुरु व संदेष्टे मारले जावेत का?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे परमेश्वरा, पाहा, हे तू कोणाला केले ह्याचा विचार कर! स्त्रियांनी आपल्या पोटचे फळ, हातावर खेळवलेली आपली बालके खावीत काय? याजक व संदेष्टा ह्यांना प्रभूच्या पवित्रस्थानात जिवे मारावे काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेह, बघा व विचार करा: तुम्ही कधी तरी कोणालाही असे वागविले आहे का? ज्या मातांनी आपल्या मुलांचे संगोपन केले, त्या मातांनी ही आपली पोटची फळे खावीत काय? प्रभूच्या मंदिरातच त्यांचे याजक आणि संदेष्ट्यांचा संहार व्हावा काय?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वरा, पाहा, जिच्याशी तू कठोरपणाने असे केले, तिच्या कडे लक्ष लाव. स्त्रियांनी आपल्या पोटच्या फळास, आपल्या मुलांना त्यांच्या बालपणातच, खावे काय? परमेश्वराच्या मंदिरात याजक व संदेष्टे मारले जावेत काय?