Lamentations 4:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
लोक ओरडले, “लांब व्हा! दूर ब्ह! आम्हाला शिवू नका.” ते लोक इकडे तिकडे भटकले कारण त्यांना घरे नव्हती. दुसऱ्या राष्ट्रांतील लोक म्हणाले, “त्यांनी आमच्याबरोबर राहू नये असेच आम्हाला वाटते.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“दूर व्हा! अमंगळ लोकहो, दूर व्हा! दूर व्हा! शिवू नका!” असे त्यांनी त्यांना ओरडून म्हटले; ते पळून जाऊन भटकत राहिले तेव्हा राष्ट्रांतले लोक म्हणाले, “त्यांना आतापासून येथे वस्ती करायची नाही.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
लोक त्यांच्यावर खेकसतात: “चालते व्हा! तुम्ही अशुद्ध आहात! दूर! दूर! आम्हाला स्पर्श करू नका!” जेव्हा ते पलायन करतात आणि तिथे भटकतात, त्या देशातील लोक म्हणतात, “ते आता इथे राहू शकत नाहीत.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दूर व्हा, “दूर व्हा! अमंगळ लोकहो.” आम्हास स्पर्श नका करू, असे लोक त्यांना म्हणाले, ते पळून जाऊन भटकत राहीले, तेव्हा राष्ट्रांमधील लोक म्हणाले, “त्यांनी आमच्याबरोबर राहू नये.”