Lamentations 4:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यहुदातील काही लोकांनी एका विशेष प्रकारे आपले जीवन देवाला वाहिले होते. ते फार शुध्द होते. ते हिमापेक्षा शुभ्र होते. दुधापेक्षा पांढरे होते. त्यांची कांती पोवळयांप्रमाणे लाल होती. त्यांच्या दाढ्या म्हणजे जणू काही तेजस्वी इंद्रनीलच.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तिचे सरदार1 बर्फाहून स्वच्छ होते, दूधाहून पांढरे होते; ते पोवळ्याहून कांतीने लाल होते; त्यांचे तेज नीलमण्यासारखे होते;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांचे अधिपती हिमापेक्षा अधिक तेजस्वी आणि दूधापेक्षा अधिक धवल होते, त्यांचे देह माणकांपेक्षा अधिक तुकतुकीत, सशक्त व निरोगी त्यांची देहरचना नीलरत्नापेक्षा अधिक तेजस्वी होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तिचे सरदार बर्फासारखे चकाकत असत व दुधापेक्षा पांढरे होते. ते पोवळयांसारखे कांतीने लाल होते. त्यांचे तेज जणू काही नीलमण्यासारखे होते.