Leviticus 10:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“त्याप्रमाणे तू, तुझे मुलगे, व तुझ्या मुली ह्यांनी, ओवळलेला ऊर व मागचा पाय स्वच्छ ठिकाणी खावा; कारण इस्राएल लोकांनी केलेल्या शांत्यर्पणाच्या यज्ञापैकी तुला तो हक्क म्हणून दिला आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ओवाळलेला ऊर आणि समर्पित केलेली मांडी ही तुम्ही, म्हणजे तू व तुझ्यासहित तुझे मुलगे व मुली ह्यांनी एखाद्या स्वच्छ स्थळी खावी; कारण इस्राएल लोकांनी केलेल्या शांत्यर्पणाच्या यज्ञांपैकी तुला व तुझ्या मुलाबाळांना ती हक्क म्हणून दिली आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु अर्पण केलेला ऊर व समर्पित केलेली मांडी मात्र तुम्ही कोणत्याही विधिनियमानुसार शुद्ध केलेल्या जागी बसून खावी. इस्राएली लोकांनी अर्पिलेल्या शांत्यर्पणाचा हा भाग तुमचे पुत्र व कन्या यांच्यासाठी आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“त्याप्रमाणे तू, तुझी मुले व तुझ्या मुली ह्यांनी, ओवाळलेला ऊर व मागचा पाय स्वच्छ ठिकाणी खावा; कारण इस्राएल लोकांनी केलेल्या शांत्यर्पणाच्या यज्ञापैकी तुला तो हक्क म्हणून दिला आहे.