Leviticus 13:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्याच्या कातडीतला तो जुनाट महारोग होय; याजकाने त्याला अशुद्ध ठरवावे; अधिक तपासणीसाठी त्याला काही काळासाठी इतरापासून वेगळे ठेवू नये, कारण तो अशुद्धच आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर त्याच्या कातडीतला तो जुनाट महारोग होय; याजकाने त्याला अशुद्ध ठरवावे; त्याला त्याने कोंडून ठेवू नये; कारण तो अशुद्धच होय.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तर हा जुना कुष्ठरोग असून याजकाने त्या व्यक्तीला अशुद्ध म्हणून जाहीर करावे, यापुढे त्याला अधिक तपासणीसाठी वेगळे ठेवू नये; कारण तो अशुद्धच आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याच्या कातडीतला तो जुनाट महारोग होय; याजकाने त्यास अशुद्ध ठरवावे; अधिक तपासणीसाठी त्यास काही काळासाठी इतरापासून वेगळे ठेवू नये, कारण तो अशुद्धच आहे.