Leviticus 13:26 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पण तपासल्यावर त्या तकतकीत डागावरचे केस पांढरे झालेले नाहीत व ती जागा कातडीपेक्षा खोल गेलेली नाही आणि ती फुसट होत चालली आहे असे याजकाला दिसून आले तर त्याने त्याला सात दिवस वेगळे ठेवावे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण तपासाअंती त्या तकतकीत डागावरचे केस पांढरे झालेले नाहीत व ती जागा कातडीपेक्षा खोल गेलेली नाही, आणि ती बुजत चालली आहे असे याजकाला दिसून आले, तर त्याने त्याला सात दिवस कोंडून ठेवावे;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण तपासणीनंतर त्या पांढर्‍या चट्ट्यावरील केस पांढरे झालेले नाहीत, आणि पांढरेपणा त्वचेच्या खोलवर गेलेला नाही व तो हळूहळू कमी होत आहे, असे जर याजकाला दिसून आले, तर याजकाने त्याला सात दिवसापर्यंत वेगळे ठेवावे;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतू तपासल्यावर त्या डागावरचे केस पांढरे झालेले नाहीत व ती जागा कातडीपेक्षा खोल गेलेली नाही आणि ती पुसट होत चालली आहे असे याजकाला दिसून आले तर त्याने त्यास सात दिवस वेगळे ठेवावे.