Leviticus 13:37 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परंतु ती चाई होती तेवढीच असेल व तिच्यावर काळे केस येत आहेत असे त्याला दिसून आले तर ती चाई बरी झाली आहे व तो माणूस शुद्ध झाला आहे; याजकाने त्याला शुद्ध ठरवावे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परंतु ती चाई होती तेवढीच असून तिच्यावर काळे केस आले आहेत असे त्याला दिसून आले, तर ती चाई बरी झाली असून तो शुद्ध होय; याजकाने त्याला शुद्ध ठरवावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण चट्टा पसरण्याची क्रिया थांबली असून तिच्यावर काळे केस सापडले, तर ती व्यक्ती बरी झाली असून शुद्ध आहे आणि याजकाने त्याला शुद्ध असे जाहीर करावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु ती चाई होती तेवढीच असेल व तिच्यावर काळे केस येत आहेत असे त्यास दिसून आले तर ती चाई बरी झाली आहे व तो मनुष्य शुद्ध झाला आहे; याजकाने त्यास शुद्ध ठरवावे.