Leviticus 14:31 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्यांच्यापैकी एकाचे पापार्पण करावे व दुसऱ्याचे होमार्पण करावे; पक्ष्यांची ही अर्पणे त्याने अन्नार्पणासहित करावी; ह्या प्रकारे याजकाने शुद्ध ठरवावयाच्या माणसाकरिता परमेश्वरासमोर प्रायश्चित करावे; मग तो माणूस शुद्ध होईल.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याला जे पक्षी मिळाले असतील त्यांच्यापैकी एकाचे पापार्पण करावे व दुसर्‍याचे अन्नार्पणासहित होमार्पण करावे; ह्या प्रकारे याजकाने शुद्ध ठरवायच्या मनुष्यासाठी परमेश्वरासमोर प्रायश्‍चित्त करावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एक पक्ष्याचे पापार्पण म्हणून व दुसर्‍या पक्ष्याचे अन्नार्पणासह होमार्पण म्हणून अर्पणे करावी. अशाप्रकारे याजकाने शुद्ध होणार्‍या माणसासाठी याहवेहपुढे प्रायश्चित्त करावे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांच्यापैकी एकाचे पापार्पण करावे व दुसऱ्याचे होमार्पण करावे; पक्ष्यांची ही अर्पणे त्याने अन्नार्पणासहीत करावी; ह्याप्रकारे याजकाने शुद्ध ठरवावयाच्या मनुष्याकरिता परमेश्वरासमोर प्रायश्चित करावे; मग तो मनुष्य शुद्ध होईल.