Leviticus 16:21 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अहरोनाने आपले दोन्ही हात त्या जिवंत बकऱ्याच्या डोक्यावर ठेवून इस्राएल लोकांची सर्व पापे व अपराध ह्यांचा अंगिकार करावा; व ती त्या बकऱ्याच्या डोक्यावर ठेवून त्याला घेऊन जाण्यासाठी तयार असलेल्या माणसाच्या हाती रानात पाठवून द्यावे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अहरोनाने आपले दोन्ही हात त्या जिवंत बकर्‍याच्या डोक्यावर ठेवून इस्राएल लोकांची सर्व दुष्कर्मे व अपराध ह्यांचा म्हणजे त्यांच्या सर्व पापांचा अंगीकार करावा; व ती त्या बकर्‍याच्या डोक्यावर ठेवून त्याला नेमलेल्या मनुष्याच्या हाती रानात पाठवून द्यावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग अहरोन आपले दोन्ही हात बोकडाच्या डोक्यावर ठेवून इस्राएली लोकांचे सर्व अन्याय, बंडखोरी—त्यांची सर्व पापे—त्या बोकडाच्या मस्तकावर ठेवावी व नेमलेल्या माणसाद्वारे त्या बोकडाला रानात पाठवून द्यावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अहरोनाने आपले दोन्ही हात त्या जिवंत बकऱ्याच्या डोक्यावर ठेवून इस्राएली लोकांची सर्व पापे व अपराध ह्यांचा अंगिकार करावा; व ती त्या बकऱ्याच्या डोक्यावर ठेवून त्यास घेऊन जाण्यासाठी तयार असलेल्या मनुष्याच्या हाती रानात पाठवून द्यावे.