Leviticus 17:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
कारण शरीराचे जीवन रक्तात असते आणि ते वेदीवर ओतण्याविषयी मी विधीनियम लावून दिले आहेत; तुम्ही घेतलेल्या जिवाच्या भरपाईबद्दल ते रक्त वेदीवर मला दिले पाहिजे; तुमच्या जिवाबद्दल प्रायश्चितासाठी ते वेदीवर ओतले पाहिजे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शरीराचे जीवन तर रक्तात असते, आणि तुमच्या जिवांबद्दल वेदीवर प्रायश्‍चित्त करण्यासाठी ते मी तुम्हांला दिले आहे; कारण रक्तात जीवन असल्याकारणाने रक्तानेच प्रायश्‍चित्त होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण शरीराचे जीवन रक्तात असते आणि तुमच्या प्रायश्चित्तासाठी मी तुम्हाला वेदीवर शिंपडण्यासाठी ते दिले आहे; रक्तात जीवन असल्यामुळे प्रायश्चित्त होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण प्राण्याचे जीवन त्यांच्या रक्तात असते आणि तुमच्या जिवाबद्दल वेदीवर प्रायश्चित करण्यासाठी ते तुम्हास दिले आहे; कारण रक्तानेच प्रायश्चित होते हेच ते रक्त आहे की ज्याद्वारे जिवाचे प्रायश्चित होते.