Leviticus 17:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“त्याचप्रमाणे कोणी इस्राएल माणूस असो किंवा त्यांच्यामध्ये राहणार परदेशीय असो! तो जर आपोआप मेलेल्या किंवा जंगली जनावराने मारलेल्या प्राण्याचे मांस खाईल तर त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे; त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे म्हणजे मग तो शुद्ध होईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कोणा मनुष्याने, मग तो स्वदेशीय असो अथवा परदेशीय असो, मेलेल्या अथवा श्वापदांनी फाडून मारलेल्या पशूंचे मांस खाईल तर त्याने आपले कपडे धुऊन पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे म्हणजे तो शुद्ध होईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ ‘जर कोणत्या व्यक्तीने, मग तो देशात जन्मलेला किंवा विदेशी असो, यापैकी जो कोणी मेलेल्या किंवा जंगली जनावराने फाडलेल्या मृत प्राण्याचे मांस खाईल, त्याने आपली वस्त्रे धुवावी व पाण्याने स्नान करावे आणि तो संध्याकाळपर्यंत विधिनियमानुसार अशुद्ध राहील आणि त्यानंतर तो शुद्ध होईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“कोणी मनुष्याने मग तो त्यांच्यामध्ये राहणार किंवा परदेशीय असो! तो जर मरण पावलेल्या किंवा जंगली जनावराने मारलेल्या प्राण्याचे मांस खाईल त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे; म्हणजे तो शुद्ध होईल.