Leviticus 20:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तर मी त्या माणसाच्या व त्याच्या कुटुंबाच्या विरुद्ध होईन! आणि त्याला व मजवर अविश्वास दाखवून जे कोणी मोलख दैवताच्या नादी लागून त्याच्या मागे जातील त्यांना आपल्या लोकांतून बाहेर टाकीन!
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर मी त्या मनुष्याला व त्याच्या कुटुंबाला विन्मुख होऊन त्याचा व जे कोणी त्याला अनुसरून व्यभिचारी मतीने मोलखाच्या नादी लागतील, त्या सर्वांचा स्वजनातून उच्छेद करीन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी स्वतः त्याच्याविरुद्ध व त्याच्या घराण्याविरुद्ध मुख फिरवेन आणि मोलखबरोबर व्यभिचार करून त्याचे अनुकरण करणार्‍या सर्वांचा त्यांच्या लोकांतून नाश करेन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तर मी त्या मनुष्याच्या व त्याच्या कुटुंबाच्या विरूद्ध होईन! आणि त्यास व मजवर अविश्वास दाखवून जो कोणी व्यभिचारी मतीने मोलख दैवताच्या नादी लागून त्यांच्यामागे जातील त्यांना आपल्या लोकांतून बाहेर टाकीन!