Leviticus 26:34 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“तुम्हाला तुमच्या शत्रूच्या देशात नेतील; तुमचा देश ओसाड होईल. तेव्हा अखेरीस तुमच्या देशाला विसावा मिळेल. तो शब्बाथाचा विसावा उपभोगील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जितके दिवस देश ओस पडून राहील आणि तुम्ही आपल्या शत्रूंच्या देशात राहाल तितके दिवस तुमचा देश आपले शब्बाथ उपभोगत राहील; तेव्हा देशाला विसावा मिळून तो आपले शब्बाथ उपभोगत राहील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा तुम्ही शत्रूंच्या देशात असाल, तुमचा देश उजाड होईल; तेव्हा भूमीला विश्रांती मिळेल व भूमी तिच्या शब्बाथ वर्षांचा संपूर्ण वेळ आनंद करेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जितके दिवस देश ओसाड पडून राहील आणि तुम्ही आपल्या शत्रूंच्या देशात रहाल तितके दिवस तुमचा देश आपले शब्बाथ उपभोगीत राहील.