Leviticus 27:28 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“लोक परमेश्वराला काही विशेष देणगी देतात, ती देणगी माणसे, पशू किंवा वतनांची शेते ह्या प्रकारची असेल; ती देणगी परमेश्वराचीच आहे; ती सोडवून परत घेता येणार नाही किंवा विकता येणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तथापि कोणी आपल्या सर्वस्वापैकी जे काही परमेश्वराला समर्पित करील, मग तो मानवप्राणी असो, पशू असो किंवा त्याच्या वतनाचे शेत असो, ते विकू नये किंवा सोडवू नये; जे काही समर्पित केले असेल ते परमेश्वराप्रीत्यर्थ परमपवित्र समजावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ ‘एखादा मनुष्य आपल्याजवळ असलेले काहीही याहवेहला समर्पित करेल—मग ते एखादी व्यक्ती असो, पशू असो वा वतनाची जमीन असो—ते विकू नये किंवा खंडणी भरून सोडवूनही घेऊ नये; कारण समर्पित ते सर्व याहवेहसाठी परमपवित्र आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लोक परमेश्वरास काही विशेष देणगी देतात, ती देणगी माणसे, पशू किंवा वतनांची शेते या प्रकारची असेल, ती देणगी परमेश्वराचीच आहे; ती सोडवून परत घेता येणार नाही किंवा विकता येणार नाही.