Leviticus 5:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
माणसाच्या आंतून बाहेर पडणाऱ्या स्राव इत्यादि अनेक गोष्टी अशुद्ध असतात; एखादा माणूस दुसऱ्या माणसाच्या अशा अशुद्ध गोष्टीला न कळत शिवला व आपण अशुद्ध झालो आहो असे त्याला नंतर कळाले तर तो दोषी ठरेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याचप्रमाणे मनुष्याशी संबंध असलेल्या एखाद्या अशुद्ध वस्तूला कोणी नकळत शिवला आणि आपण अशुद्ध झालो आहोत असे त्याला नंतर कळून आले तर तो दोषी समजावा; मग ती अशुद्ध करणारी वस्तू कोणत्याही प्रकारची असो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कोणत्याही प्रकारच्या मानवी अशुद्धतेस कोणतीही व्यक्ती अजाणतेने स्पर्श करेल आणि ते अशुद्ध झाले आहेत हे त्यांना समजणार नाही, परंतु नंतर त्यांना त्यांचा दोष समजून आल्यास;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याचप्रमाणे मनुष्याशी संबध असलेल्या एखाद्या अशुद्ध वस्तुला नकळत स्पर्श केला व आपण अशुद्ध झालो आहो असे त्यास नंतर कळाले तर तो दोषी ठरेल.