Leviticus 6:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ते खमीर घालून भाजू नये; माझ्या अर्पणातून याजकाचा वाटा म्हणून मी ते त्याना दिलेले आहे; पापार्पण व दोषार्पण ह्या सारखेच हेही परमपवित्र आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
खमीर घालून ते भाजू नये. माझ्या हव्यातून त्यांचा वाटा म्हणून मी ते त्यांना दिले आहे; पापार्पण अथवा दोषार्पण जसे परमपवित्र आहे तसेच हेही आहे;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो खमिरासह भाजू नये. मला अर्पिलेल्या होमार्पणाचा हा भाग मी माझ्या अर्पणातून याजकांना त्यांचा वाटा म्हणून दिला आहे. दोषार्पण व पापार्पण त्याप्रमाणेच हे देखील परमपवित्र आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते खमीर घालून भाजू नये; माझ्या अर्पणातून याजकाचा वाटा म्हणून मी ते त्यांना दिलेले आहे; पापार्पण व दोषार्पण या सारखेच हेही परमपवित्र आहे.