Leviticus 6:25 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना सांग की पापार्पणाचा विधि असा. ज्या ठिकाणी होमबलीचा वध करतात त्याच ठिकाणी परमेश्वरासमोर पापबलीचाही वध करावा; तो परमपवित्र आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना सांग की, पापार्पणाचा विधी असा: ज्या ठिकाणी होमबलीचा वध करतात तेथेच परमेश्वरासमोर पापबलीचाही वध करावा; तो परमपवित्र होय.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“अहरोन व त्याच्या पुत्रांना सांग, पापार्पणासंबंधी नियम हे आहेत: ज्या स्थळी होमार्पणाच्या पशूंचा वध करतात त्याच स्थळी या पापार्पणाच्या पशूचाही याहवेहसमोर वध करावा. हे परमपवित्र आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अहरोन व त्याचे पुत्र ह्याना सांग की पापार्पणाचा विधी असा. ज्याठिकाणी होमबलीचा वध करतात त्याच ठिकाणी परमेश्वरासमोर पापबलीचाही वध करावा; तो परमपवित्र आहे.