Leviticus 6:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
खोटे वचन देऊन न केलेले काम त्या प्रत्येकाबद्दल त्याने पूर्ण भरपाई करावी आणि त्या त्या वस्तूंच्या किंमतीचा पांचवा हिस्सा अधिक भरावा. त्याने खऱ्या मालकाला पैसे द्यावेत; दोषार्पण आणण्याच्या दिवशीच त्याने हे करावे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
किंवा ज्या एखाद्या वस्तूच्या बाबतीत त्याने खोटी शपथ वाहिली असेल ती त्याने पुरी भरून द्यावी. ज्या वस्तूचा त्याने अपहार केला असेल तिची पुरी भरपाई आपल्या दोषार्पणाच्या दिवशी करून देऊन वर आणखी तिचा एक पंचमांश भाग त्याने द्यावा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
किंवा अशा कोणत्याही गोष्टीबद्दल त्यांनी खोटी शपथ घेतली असेल तर, ज्या दिवशी दोषार्पण आणतील, त्याच दिवशी त्यांनी त्यांच्या गुन्ह्याबद्दल वीस टक्के अधिक दंड म्हणून त्या वस्तूच्या मालकाला द्यावा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
किंवा एखाद्या कामाबद्दल खोटी शपथ वाहीली तर ती त्याने पूर्ण भरून द्यावी ज्या वस्तुचा त्याने अपहार केला असेल तिची पूर्ण भरपाई आपल्या दोषार्पणाच्या दिवशी करून देऊन त्या वस्तूंच्या किंमतीचा पाचवा हिस्सा अधिक भरावा;