Leviticus 8:31 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मोशे अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना म्हणाला, “मी सांगितल्याप्रमाणे, ‘अहरोन व त्याच्या मुलांनी हे मांस खावे;’ तेव्हा ही भाकरीची टोपली व याजकाच्या समर्पणासाठीचे हे मांस घ्या; दर्शनमंडपाच्या दारापाशी ते शिजवा आणि मी सांगितल्याप्रमाणे मांस व भाकर तेथेच खा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मोशेने अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना सांगितले की, “हे मांस दर्शनमंडपाच्या दाराजवळ शिजवा आणि तेथे समर्पणाच्या टोपलीतल्या भाकरीबरोबर ते खा; मी आज्ञा दिल्याप्रमाणे अहरोनाने व त्याच्या मुलांनी ते खावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग मोशे, अहरोन व त्याच्या पुत्रांना म्हणाला, “मी तुम्हाला आज्ञा दिली होती त्याप्रमाणे, सभामंडपाच्या प्रवेशद्वारात मांस शिजवा व ते मांस टोपलीतील समर्पित भाकरीसह खावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मोशे अहरोन व त्याचे पुत्र ह्याना म्हणाला, “मी सांगितल्याप्रमाणे, ‘अहरोन व त्याच्या मुलांनी हे मांस खावे;’ तेव्हा ही भाकरीची टोपली व याजकाच्या समर्पणासाठीचे हे मांस घ्या; दर्शनमंडपाच्या दारापाशी ते शिजवा आणि मी सांगितल्याप्रमाणे मांस व भाकर तेथेच खा.