Luke 1:17 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
योहान स्वत: देवापुढे चालेल, तो एलीयाप्रमाणे समर्थ होईल. एलीयाला जो आत्मा होता, तोच त्याला असेल. तो वडिलांची अंत:करणे त्याच्या मुलांकडे वळवील. आज्ञा न मानणाऱ्यांना तो धार्मिकतेकडे नेईल. प्रभुसाठी लोकांना तयार करण्यासाठी तो या गोष्टी करील.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
एलियाच्या मनोवृत्तीने व सामर्थ्याने तो परमेश्वरापुढे चालेल. वडील आणि मुले यांच्यामध्ये तो पुन्हा ऐक्य प्रस्थापित करील. आज्ञाभंग करणाऱ्या लोकांची विचारसरणी नीतिमान लोकांच्या विचारसरणीसारखी बदलून तो प्रभूसाठी प्रजा तयार करील.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
‘बापाची अंतःकरणे मुलांकडे’, व आज्ञाभंजक लोकांना नीतिमान जनांच्या ज्ञानाकडे वळवून प्रभूसाठी सिद्ध प्रजा तयार करावी म्हणून तो एलीयाच्या आत्म्याने व सामर्थ्याने त्याच्यापुढे चालेल.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो एलीयाहच्या आत्म्याने व सामर्थ्याने प्रभूच्या पुढे चालेल, आईवडिलांची हृदये त्यांच्या लेकरांकडे वळवेल व अवज्ञा करणार्‍यांना नीतिमानांच्या ज्ञानाकडे वळवेल व लोकांना प्रभूच्या मार्गाप्रमाणे चालण्यासाठी तयार करेल.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि देवासाठी सिद्ध झालेले असे लोक तयार करायला, वडिलांची अंतःकरणे मुलांकडे आणि आज्ञा न मानणार्‍यांना नीतिमानांच्या ज्ञानाकडे वळवून प्रभूसाठी तयार केलेली प्रजा उभी करावयाला तो एलीयाच्या आत्म्याने आणि सामर्थ्याने त्यांच्यापुढे चालेल.