Luke 1:25 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“शेवटी आता प्रभुने मला या मार्गाने मदत केली आहे. लोकांमध्ये माझी लाज राखण्यासाठी त्याने माझी पुष्कळ काळजी घेतली.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ती म्हणत असे, “लोकांत होणारी माझी मानहानी दूर करण्यासाठी प्रभूने मला साहाय्य केले.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ती म्हणत असे की, “लोकांत माझा होणारा अनादर दूर करण्यासाठी प्रभूने माझ्याकडे पाहिले तेव्हा माझ्यासाठी त्याने असे केले.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ती म्हणाली, “प्रभूने हे माझ्यासाठी केले आहे, या दिवसांमध्ये त्यांची कृपादृष्टी मजवर करून लोकांमध्ये होणारी माझी मानहानी दूर केली आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लोकांमध्ये माझा होणारा अनादर दूर करण्यासाठी प्रभूने माझ्याकडे पाहिले तेव्हा त्याने माझ्यासाठी असे केले.