Luke 1:66 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ज्या कोणी हे ऐकले त्या प्रत्येकाने याविषयी नवल केले, ते म्हणाले, “हे मूल पुढे कोण होणार आहे?” कारण देवाचा वरदहस्त त्यांच्यावर होता.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ऐकणाऱ्या सर्वांनी ह्या घटनांवर मनन करीत म्हटले, “हा बालक होणार तरी कोण?” कारण खरोखर त्याच्या ठायी प्रभूचे सामर्थ्य होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ऐकणार्या सर्वांनी ह्या गोष्टी आपल्या अंतःकरणात ठेवून म्हटले, “हा बालक होणार तरी कोण?” कारण प्रभू त्याच्याबरोबर होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ज्या प्रत्येकाने याविषयी ऐकले व नवल करून म्हटले, “हा बालक पुढे कोण होणार?” कारण प्रभूचा हात त्याजबरोबर होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जे कोणी हे ऐकले ते प्रत्येकजण मनात विचार करत होते, ते म्हणाले, हे मूल पुढे कोण होणार आहे? प्रभू त्याच्याबरोबर आहे असे त्यांच्या लक्षात आले.