Luke 1:80 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अशा रीतीने तिचा मुलगा मोठा होत गेला आणि आत्म्यात सामर्थ्यशाली झाला. इस्राएल लोकांना प्रगट होण्याच्या दिवसापर्यंत तो अरण्यात राहिला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तो बालक वाढत असता त्याचा आत्मिक विकास होत गेला आणि इस्राएली लोकांसमोर जाहीरपणे प्रकट होण्याच्या दिवसापर्यंत तो अरण्यात राहिला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो बालक वाढत गेला व आत्म्यात बलवान होत गेला, आणि इस्राएलास प्रकट होण्याच्या दिवसापर्यंत अरण्यात राहिला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो बालक वाढत गेला आणि आत्म्यात बलवान झाला व त्याची वाढ झाली आणि तो इस्राएली लोकांस जाहीरपणे प्रकट होईपर्यंत अरण्यात राहिला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग तो मुलगा वाढत गेला आणि आत्म्यात सामर्थ्यशाली झाला. इस्राएल लोकांस प्रकट होण्याच्या दिवसापर्यंत तो अरण्यात राहिला.