Luke 10:13 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“खोराजिना तुझ्यासाठी हे वाईट होईल! बेथसैदा तुझ्यासाठी हे वाईट होइल! कारण जे चमत्कार तुम्हांमध्ये घडले ते जर सोर व सिदोनमध्ये घडले असते तर त्यांनी फार पूर्वीच गोणपाट नेसून राखेत बसून पश्चात्ताप केला असता.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
हे खोराजिना, तुझी केवढी दुर्दशा होणार! हे बेथ्सैदा, तुझीदेखील केवढी दुर्दशा होणार! कारण तुमच्यामध्ये जी सामर्थ्यशाली कृत्ये घडली ती सोर व सिदोन ह्यांत घडली असती, तर त्यांनी अगोदरच गोणपाट नेसून व राखेत बसून पश्‍चात्ताप केला असता व त्यांच्या पापांपासून परावृत्त झाल्याचे दाखवून दिले असते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे खोराजिना, तुझी केवढी दुर्दशा होणार! हे बेथसैदा, तुझी केवढी दुर्दशा होणार! कारण तुमच्यामध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सोर व सीदोन ह्यांत घडली असती तर त्यांनी मागेच गोणपाट व राख अंगावर घेऊन बसून पश्‍चात्ताप केला असता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“खोराजिना, तुला धिक्कार असो! बेथसैदा, तुला धिक्कार असो! कारण जे चमत्कार तुमच्यामध्ये केले ते सोर आणि सीदोनात केले असते, तर ते गोणपाट नेसून आणि डोक्यात राख घालून केव्हाच पश्चात्ताप करीत बसले असते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“हे खोराजिना, तुला हाय! हे बेथसैदा, तुला हाय! कारण तुमच्यामध्ये जी सामर्थ्याची कृत्ये होत आहेत ती जर सोर व सिदोन यांच्यामध्ये झाली असती तर त्यांनी मागेच गोणताट अंगावर घेऊन व राखेत बसून पश्चात्ताप केला असता.