Luke 10:40 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण मार्थेची अति कामामुळे तारांबळ झाली. ती येशूकडे आली आणि म्हणाली, “प्रभु, माझ्या बहिणीने सर्व काम माइयावर टाकले याची तुला काळजी नाही काय? तेव्हा मला मदत करायला तिला सांग.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मार्थाला फार काम पडल्यामुळे तिची तारांबळ उडाली आणि ती पुढे येऊन म्हणाली, “प्रभो, माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकला आहे, ह्याची आपल्याला पर्वा नाही काय? मला साहाय्य करायला तिला सांगा.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा मार्थेला फार काम पडल्यामुळे तिची तारांबळ उडाली आणि ती पुढे येऊन म्हणाली, “प्रभूजी, माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकला आहे, ह्याची आपल्याला पर्वा नाही काय? मला साहाय्य करायला तिला सांगा.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तरी सर्व गोष्टींची तयारी करताना मार्था कंटाळून गेली आणि प्रभूला म्हणाली, “प्रभूजी, माझ्या बहिणीने कामाचा भार माझ्या एकटीवरच टाकला आहे, याची तुम्हाला काळजी नाही काय? तिला मला मदत करावयास सांगा.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण मार्थेची अति कामामुळे तारांबळ झाली. ती येशूकडे आली आणि म्हणाली, “प्रभू, माझ्या बहिणीने सर्व काम माझ्यावर टाकले याची तुला काळजी नाही काय? तेव्हा मला मदत करायला तिला सांग.”