Luke 10:7 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्या घरात तुम्हांला जे देतील ते खातपीत राहा. कारण कामकरी हा त्याच्या मजुरीस पात्र आहे. या घरातून त्या घरात असे घर बदलू नका.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्याच घरात वस्ती करून ते जे देतील ते खातपीत राहा कारण कामगाराला त्याचे वेतन मिळायला हवे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच घरात वस्ती करून ते जे देतील ते खातपीत राहा, कारण कामकरी आपल्या मजुरीला योग्य आहे. घरोघर फिरू नका.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
घरोघरी न जाता तिथेच राहा आणि तुम्हाला जे देण्यात येईल, ते खा व प्या. कारण कामकरी आपल्या वेतनास पात्र आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुम्ही त्याच घरात राहून ते देतील ते खातपीत जा; कारण कामकरी आपल्या मजुरीस योग्य आहे; घरोघरी फिरू नका.