Luke 11:17 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पण त्यांच्या मनात काय होत हे त्याला माहीत होते आणि तो त्यांना म्हणाला, “आपसात फूट पडलेले प्रत्येक राज्य ओसाड पडते आणि एखाद्या घरात एकमेकांविरुद्ध भांडतात तेव्हा त्या घराचे तुकडे होतात.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
परंतु त्याने त्यांच्या मनातील कल्पना ओळखून त्यांना म्हटले, “आपसात फूट पडलेले कोणतेही राष्ट्र फार काळ टिकत नाही आणि कुटुंब आपसात भांडू लागले, तर तेही दुभंगते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परंतु त्याने त्यांच्या मनातील कल्पना ओळखून त्यांना म्हटले, “आपसांत फूट पडलेले प्रत्येक राज्य ओसाड पडते, आणि घरावर घर पडते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांचे विचार येशूंना माहीत होते आणि ते त्यांना म्हणाले, “ज्या राज्यात फूट पडलेली आहे, त्या राज्याचा नाश होतो आणि आपसात फूट पडलेले घर कोसळून पडते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण त्यांच्या मनात काय होते हे तो जाणून होता म्हणून तो त्यांना म्हणाला, “आपसात फूट पडलेले प्रत्येक राज्य ओसाड पडते आणि एखाद्या घरातील लोक एकमेकांविरुद्ध भांडतात तेव्हा त्या घराचे तुकडे होतात.