Luke 11:22 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परंतु कोणी त्याच्याहीपेक्षा अधिक बलवान त्याच्यावर हल्ला करुन त्याचा पराभव करतो, तेव्हा ज्या शस्त्रसामग्रीवर त्यांने भरंवसा ठेवला होता, ती तो घेऊन जातो व त्याला मिळालेली लूट आपल्या मित्रांना वाटतो.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
परंतु जेव्हा त्याच्यापेक्षा अधिक बलवान मनुष्य येऊन त्याच्यावर ह्रा करतो व विजय मिळवतो तेव्हा ज्या शस्त्रसामग्रीवर त्याने भिस्त ठेवली होती, ती तो घेतो आणि लूट म्हणून वाटून टाकतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परंतु त्याच्यापेक्षा अधिक बलवान मनुष्य त्याच्यावर येऊन त्याला जिंकतो, तेव्हा ज्या शस्त्रसामुग्रीवर त्याने भिस्त ठेवली होती ती तो घेऊन जातो व त्याची लूट वाटून टाकतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण एखादा अधिक बलवान येऊन त्याला जिंकतो व ज्या शस्त्रांवर त्याचा भरवसा होता ते काढून त्याची सर्व मालमत्ता लुटतो व वाटून देतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु कोणी त्याच्याहीपेक्षा अधिक बलवान त्याच्यावर हल्ला करून त्याचा पराभव करतो, तेव्हा ज्या शस्त्रसामग्रीवर त्याने विश्वास ठेवला होता, ती तो घेऊन जातो व त्यास मिळालेली लूट आपल्या मित्रांना वाटतो.