Luke 11:26 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
नंतर तो जातो आणि आपणापेक्षा अधिक बळकट व दुष्ट असे सात आत्मे मिळवितो, आणि ते आत जातात आणि तेथेच राहतात. तेव्हा त्या मनुष्याची शेवटची अवस्था पहिल्यापेक्षा वाईट होते.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
नंतर तो जाऊन आपणापेक्षा अधिक दुष्ट असे सात आत्मे बरोबर आणतो आणि ते आत शिरून तेथे राहतात. मग त्या मनुष्याची ती शेवटची अवस्था पहिल्यापेक्षा वाईट होते.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नंतर तो जाऊन त्याच्यापेक्षा दुष्ट असे सात आत्मे बरोबर घेतो; आणि ते आत शिरून तेथे राहतात; मग त्या मनुष्याची ती शेवटली दशा पहिलीपेक्षा वाईट होते.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर तो जाऊन आपल्यापेक्षा अधिक दुष्ट असे आणखी सात दुरात्मे घेऊन येतो व ते आत जाऊन तिथे राहतात आणि मग त्या मनुष्याची अवस्था पहिल्यापेक्षा वाईट होते.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर तो जातो आणि आपणापेक्षा अधिक बळकट व दुष्ट असे सात आत्मे घेतो आणि ते त्या घरात जातात आणि तेथेच राहतात. तेव्हा त्या मनुष्याची शेवटची अवस्था पहिल्यापेक्षा वाईट होते.”