Luke 11:29 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जसजसा लोकसमुदाय वाढू लागला, तेव्हा तो बोलू लागला, “ही पिढी दुष्ट पिढी आहे. ती चिन्ह मागत आहे, आणि योनाच्या चिन्हाशिवाय कोणतेही चिन्ह तिला दिले जाणार नाही.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
लोकसमुदाय एकत्र जमला तेव्हा येशू म्हणाला, “ही पिढी दुष्ट पिढी आहे, ही चिन्हाची अपेक्षा करते. परंतु योनाच्या चिन्हाशिवाय हिला दुसरे चिन्ह दाखवले जाणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा लोकसमुदाय त्याच्याजवळ एकत्र जमत असताना तो असे म्हणू लागला, “ही पिढी दुष्ट पिढी आहे, ही चिन्ह मागते; परंतु योना संदेष्ट्याच्या चिन्हाशिवाय हिला दुसरे चिन्ह दिले जाणार नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आपल्या भोवती लोकांची खूपच गर्दी वाढली हे पाहून येशू म्हणाले, “ही दुष्ट पिढी चिन्ह मागते पण योनाहच्या चिन्हाखेरीज दुसरे चिन्ह या पिढीला दिले जाणार नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जसजसा लोकसमुदाय वाढू लागला, तेव्हा तो बोलू लागला, “ही पिढी दुष्ट पिढी आहे. ती चिन्ह मागत आहे आणि योनाच्या चिन्हाशिवाय कोणतेही चिन्ह तिला दिले जाणार नाही.