Luke 11:33 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ʇकोणी दिवा लावून तळघरात किंवा भांड्याखाली ठेवत नाहीत, उलट तो दिवठणीवर ठेवतात. यासाठी की जे कोणी आत येतात त्यांना प्रकाश दिसणे शक्य व्हावे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
दिवा लावून तो लपवून ठेवला जात नाही किंवा धान्यमापाखाली ठेवला जात नाही तर आत येणाऱ्यांना उजेड मिळावा म्हणून दिवठणीवर ठेवतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दिवा लावून तळघरात किंवा मापाखाली कोणी ठेवत नाही, तर आत येणार्यांना उजेड दिसावा म्हणून दिवठणीवर ठेवतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“कोणी दिवा लावून त्याचा प्रकाश लपून राहील अशा ठिकाणी किंवा मापाखाली ठेवत नाही. उलट दिवठणीवर ठेवतात, यासाठी की आत येणार्यांनाही प्रकाश मिळावा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“कोणीही दिवा लावून तळघरात किंवा भांड्याखाली ठेवत नाहीत, तर आत येणाऱ्यांना प्रकाश दिसवा म्हणून तो दिवठणीवर ठेवतात.